चौथा स्तंभ पञकार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी रणजित इंगळे हत्या प्रकरणी चौकशीची मागणी…

0
250

पुणे, दि २० (पीसीबी) : राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांचे पालकत्त्व असलेल्या अकोला जिल्ह्यात शनिवारी रात्री दै वृत्तरत्न सम्राटचे अकोला प्रतिनिधी प्रा. रणजित इंगळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली याचा निषेध नोंदविण्यासाठी चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघ आणि पुणे पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी आणि सामाजिक संघटनां यांच्या वतीने पुणे उप जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना संस्थापक अध्यक्ष विकास कडलक यांच्या हस्ते मागणीचे निवेदन दिले. इंगळे हे दोन्ही पायांनी दिव्यांग असून अजात शत्रू  व्यक्तिमत्तव होते.

एका सामाजिक कार्याचा वसा चालविणारे आणि पत्रकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्यक्तिमत्वाचा अशा प्रकारे हत्या होते हि संतापजनक गोष्ट आहे.हे संपुर्ण व्यवस्थेला एक प्रकारे अहवान आहे. पत्रकारांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या कडे सरकार लक्ष देईल का? प्रा.रणजीत इंगळे यांच्या हत्येची सीआयडी चौकशी करावी,प्रा.रणजीत इंगळे यांच्या कुटुबांला ५० लाखाची मदत करावी व आरोपीना पकडुन कठोर कारवाई करावी हि देखील मागणी या वेळी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी संघटनेचे संस्थापक सचिव दिलीप देहाडे, पुणे जिल्हाध्यक्ष तथा सम्राटचे पुणे पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी दत्ता सूर्यवंशी, पुणे शहर अध्यक्ष विनोद बचुटे,उपाध्यक्ष सुनील गायकवाड, बाळासाहेब भालेराव, धम्मक्रांती महोत्स्व समिती अध्यक्ष इंद्रजित भालेराव, शाहू ,फुले, आंबेडकर विचार मंच विजय जाधव, पुणेकर माझा चॅनेल चे संपादक संतोष शिंदे, मुस्लिम नेते मैनुउद्दीन अत्तार, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने, पत्रकार यशवंत शिंदे यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र जाहीर निषेध करून लवकरात लवकर मारेकऱ्यांचा उद्देश शोधून काढून पत्रकारांवर असे भ्याड हल्ले करण्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.आणि कारवाई न झाल्यास पत्रकारांच्या स्वरक्षण करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.