चौघांकडून तरुणाला विनाकारण बेदम मारहाण

0
249

हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) – घरी जात असलेल्या तरुणासोबत चार जणांनी विनाकारण वाद घातला आणि बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 14) मध्यरात्री साडेबारा वाजता राजयोग हॉटेलच्या मागे हिंजवडी येथे घडली.

अनिकेत विलास मुरकुटे (वय 28, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक दयानंद कोडे (वय 25, रा. रहाटणी, वाकड) आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नितीन भेगडे यांच्या खोलीत भाड्याने राहतात. ते मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घरी जात होते. राजयोग हॉटेलच्या मागील बाजूला त्यांना घर मालक नितीन भेगडे दिसले. त्यामुळे त्यांनी भेगडे यांना ओळख दिली. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यासोबत विनाकारण वाद घातला. दांडके आणि रॉडने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या डोक्याला 22 टाके पडले. उजव्या हाताच्या तर्जनीस फ्रॅक्चर झाले. संपूर्ण अंगावर मुका मार लागला तसेच खरचटल्याने ते गंभीर जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.