चोरी प्रकरणी तीन ज्येष्ठांवर गुन्हा

0
546

आळंदी , दि. २५ (पीसीबी) देवाच्या समोर ठेवलेली रोकड तीन ज्येष्ठांनी चोरून नेली. ही घटना 7 ऑक्‍टोबर 2022 ते 5 मे 2023 या कालावधीमध्ये कोयाळी येथील श्री भानोबा देव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये घडली.

बबन महादू कोळेकर (वय 60), सिताराम महादेव कोळेकर (वय 65) आणि दत्तात्रय विठोबा कोळेकर (वय 60, सर्व रा. कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. बाळकृष्ण तात्याबा कोळेकर (वय 53, रा. कोयाळी) यांनी सोमवारी (दि. 24) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी आपसात संगणमत करून श्री भानोबा देवाच्या समोरील तसेच देवाच्या अंगावरील 50 व 100 रुपयांच्या नोटा असे एकूण 2 हजार 700 घेत असताना दिसून आले. सदरची मालमत्ता ही फिर्यादीची अथवा विश्वस्तांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.