चोरीच्या संशयावरून तरुणाला मारहाण

0
112

पिंपरी, दि. 14 (पीसीबी) : चोरी केल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 11) रात्री गेलार्ड चौक पिंपरी येथील हॉंगकॉंग स्पोर्ट टॉईज या दुकानात घडली.

अनिल गोपीचंद केसवानी (वय 36, रा. साई चौक, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयप्रकाश हरीश वासवानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयप्रकाश वासवानी याने फिर्यादी अनिल केसवानी यांच्या मुलाने चोरी केल्याचे समजून त्याला कानाखाली, गालावर व डोळ्यावर मारहाण केली. त्यानंतर लाकडी बॅटने पाठीवर मारून दुखापत केली. तू जर घरी सांगितले तर तुला जिवे मारून टाकतो, अशी धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.