चोरीचा आळ घेतला म्हणून दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण

0
341

थेरगाव, दि. १२ (पीसीबी) – हरवलेला मोबाईल तुमच्याकडे आहे का अशी विचारणा केली म्हणून पती-पत्नीला शिवीगाळ व मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.11) थेरगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी अब्दुल मजीद अन्सारी (वय 34 रा.थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून राजू सहानी (वय 45 रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरासमोर थांबले होते यावेळी आरोपी व त्याचा मुलगा तेथे आले. यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या हरवलेल्या मोबाईल बाबत त्यांना काही माहिती आहे का शी विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला आमच्यावर चोरीचा आळ घेतो का म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.