चोरट्यांनी ब्युटी पार्लरवर केला हात साफ..

0
606

चिखली, दि. ३० (पीसीबी) – ब्युटी पार्लरचे गेट उचकटून चोरट्यांनी एक लाख 87 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 28) रात्री साडेआठ ते शुक्रवारी (दि. 29) सकाळी साडेनऊ वाजताच्या कालावधीत चिखली येथील लोटस बी ऑन सलून अँड इन्स्टिट्यूट आणि लेडीज दुकान घडली.

रोहित रमेश सोरटे (वय 47, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चिखली-जाधववाडी रोडवर गोल्डन ओर्चीड सोसायटीमध्ये ब्युटी पार्लर आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे गेट व दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून रोख रक्कम, ब्युटी पार्लरसाठी लागणारे साहित्य, ब्लाउज, पिकोफॉल करण्यासाठी दुकानात आलेल्या पाच साड्या, 10 लेडीज ड्रेस असा एकूण एक लाख 87 हजारांचा माल चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.