चैत्र एकादशी निमित्त चिंचवड मधून पंढरपुरात खास रुग्णवाहिका; वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोफत सुविधा

0
298

निगडी, दि. ३१ (पीसीबी) – चैत्री एकादशी‌ यात्रे निमित्ताने पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारकरी भक्तांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट तर्फे मोफत वैद्यकीय औषधे व उपचारासाठी आज सकाळी चिंचवड येथून खास रुग्णवाहिका पाठविण्यात आली.

क्विन्स टाऊन सोसायटी येथुन नारळ वाढवून पिंपरी चिंचवड औषधे विक्री (दवा बाजार) चे अध्यक्ष श्री व सौ. संतोष खिवसरा यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्कार सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संजय खानोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते राजु कांबळे व पुणे विभाग प्रमुख मुकेश सोमैय्या यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते राम नलावडे, डॉ वसंतराव गोरडे, डॉ निलिमा बांगी, प्रदीप तासगांवकर संतोष नलावडे, प्रकाश सातव, डॉ प्रमोद इंगळे, अरुण महाजन, सिताराम आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.यात्रा काळात २ ते ३ लाख लोक पंढरपूरला येतात. तिथे वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट तर्फे २४ तास मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाते.