चेतन बेंद्रे यांची महाराष्ट्र राज्य पदवीधर आघाडी अध्यक्ष पदावर नियुक्ती

0
232

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) चेतन गौतम बेंद्रे यांची आम आदमी पार्टीच्या पदवीधर आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदावर नियुक्ती कऱण्यात आली. महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटन वाढीच्या दृष्टीने राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचे आपचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी सांगितले.

व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले चेतन बेंद्रे आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत होते. याआधी पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराच्या कार्याध्यक्ष, तसेच शहर अध्यक्ष पदावर काम केले असून अस्तित्व फाउंडेशनमार्फत शहरामधे कोविड काळात गरजूंना मदत, आर टी इ प्रवेशासाठी मोहीम, रक्तदान शिबिरे अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहेत.

पदवीधर राज्य आघाडीच्या नवीन जबाबदारी बाबत आभार व्यक्त करताना चेतन बेंद्रे म्हणाले कि पदवीधर युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर राज्यातील पदवीधरांचे संघटन करणार असून शासकीय भरतीमधील सरकारच्या गलथान कारभारा विरोधात आवाज उठवणार असल्याचे सांगितले.