चुकीची पूररेषा रद्द करा, कासारवाडी ग्रामस्थांची अजितदादा यांच्याकडे मागणी

0
134

 कासारवाडीमधिल पवना नदीची चुकीची पुररेषा (ब्ल्यु लाईन,रेड लाईन) पाटबंधारे विभागाने आखली आहे, ती तत्काळ रद्द करण्याची मागणी कासारवाडी ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देताना भाजपा शहर जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रकाश जवळकर, त्याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णासाहेब बनसोडे,उद्योजक बाळासाहेब जवळकर, युवा उद्योजक रघुनाथ जवळकर, गणेश जवळकर, संजयजी लांडगे, सतिशशेठ लांडगे, रविंद्र लांडगे, शिक्षण मंडळ माजी सभापती अण्णासाहेब दहितुले,नानासाहेब डवरी, मेहबूब इनामदार, तुषार माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
चुकीच्या पुररेषेमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे फार मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.आजूबाजूला लोकवस्ती वाढल्यामुळे पेरलेली पिकांची मोठ्या प्रमाणात चोरी होते तसेच पक्षीही खुपचं त्रास देतात व मोकाट जनावरे पिकांचे नुकसान करतात.त्यामुळे शेती करणेही अवघड होऊन बसले आहे.पुररेषेमुळे २ते ३ एकर क्षेत्रावर गदा आल्याने सदर जागेत व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळत नसल्यामुळे तसेच आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी नसल्याने मुले बेकार फिरतात त्यामुळे मुलांचे जीवन धोक्यात आले आहे.तसेच या चुकीच्या पुररेषेमुळे जमिनीचे भाव एकदम खाली आल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.तसेच सन २००५ साली पुर आला होता.तदनंतर आजतागायत पवना नदीला पुर आलेला नाही.मग २०वर्षानंतर हा पुररेषेचा अट्टाहास का धरला जातो हे समजत नाही.म्हणुन शासनाने आमच्या शेतकऱ्यांच्या शेतावर आखलेली पुररेषा(ब्ल्यु लाईन,रेड लाईन) पुर्णपणे रद्दबातल करावी अशी शासनाला विनंती वजा निवेदन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना देण्यात आले.