चीनमध्ये व्यापारी इमारतीला भीषण आग

0
479

शांघाय, दि. १६ (पीसीबी) : चीनमध्ये एका गगनुचंबी इमारतीला भीषण आग लागल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. २०० मीटर उंचीच्या या इमारतीचे जवळपास सर्वच मजले या आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. पहिल्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत उठणाऱ्या ज्वाळा पाहून धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील टेलिकॉम कंपनीच्या बिल्डिंगला भीषण आग लागली. २०० मीटर अर्थात ६५६ फूट उंचीच्या या इमारतीचे डझनावर मजल्यांना या आगीनं वेढलं आहे. या आगीमुळं आकाशात उंच दाट धुराचं साम्राज्य पसरलं आहे. चीनच्या हुनान या दक्षिण प्रांताची राजधानी चांगशा इथं ही दुर्घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत पण यामध्ये जीवितहानी झालीए का? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.