चिन्मय मिशन संस्थेच्या ज्येष्ठ सेविका सुनीता नायडू यांचे निधन

0
178

पिंपरी, दि. २४ (पीसीबी)- चिन्मय मिशन संस्थेच्या ज्येष्ठ सेविका सुनीता मधुकर नायडू उर्फ अम्मा (वय 82) यांचे दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी निधन झाले. अम्मांनी व त्यांचे पती कै. मधुकर उर्फ भाई नायडू यांनी चिंचवड भागात सर्वप्रथम चिन्मय मिशनच्या कार्याची सुरुवात केली व विस्तार केला. बाबा आमटे यांच्या आनंदवनशी सुद्धा त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध होता. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, सून, मुलगी, जावई व दोन नातवंडे असा परिवार आहे.