चित्र शिल्प प्रदर्शनात रसिक अनुभवताहेत विविध कलाकृती

0
3

पुणे, दि. ४ -(पीसीबी) फिगरेटीव्ह आर्ट, बंजारा चित्रशैली सिरीज, निसर्गचित्र, अमूर्त शैलीतील कलाकृती आणि शिल्पे रसिकांना भुरळ घालत आहेत. चित्र प्रदर्शनाला पहिल्या दोन्ही दिवशी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकाच ठिकाणी रसिक विविध कलाकृतींचा अनुभव घेत आहेत. हे प्रदर्शन येत्या ५ ऑगस्ट पर्यंत सकाळी १० ते ०६ या वेळेत सुरू राहणार आहे.
पुण्यातील आर्ट बिटस् फाउंडेशनच्या वतीने व आर सी स्टुडिओच्या सहकार्याने बालगंधर्व कलादालन येथे महाराष्ट्रातील निवडक तरुण चित्रकारांच्या विविध चित्र व शिल्पकारांनी कलाकृतिचा समावेश आहे. या प्रदर्शनात चित्रकार अमित तरडे, अर्चना चव्हाण, मुंजा नरवडे, मनोज पवार, प्रियांका सावंत, रोहित यादव, रुपल फाटेरपेकर, राहुल पवार, विजय गव्हाणकर, विनोद विरणक व शिल्पकार शुभम माने यांचा सहभाग आहे.