चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याच्या बहाण्याने चित्रपट निर्मात्याची 12 लाखांची फसवणूक

0
78
187143521

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) हिंजवडी,
चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचे आश्वासन दिले. तो रिलीज केला. मात्र त्यातून मिळणारे पैसे न देता चित्रपट निर्मात्याची फसवणूक केली. ही घटना एप्रिल 2021 ते 30 जून 2024 या कालावधीत सुप्रीम हेडक्वार्टर, बाणेर येथे घडली.

बलभीम सखाराम पठारे (वय 57, रा. अहमदनगर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हीमास एशिया कंपनी प्रा लीचे संचालक साकेत सावंत (रा. बदलापूर), संचालिका आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अक्षर फिल्मस प्रा ली निर्मित सांजीदा चित्रपट आरोपींनी त्यांच्या व्हीमास एशिया या ओटीटीवर रिलीज करून देतो असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून सात लाख पाच हजार 800 रुपये घेतले. त्यानंतर दिनेश जगताप यांच्या दिनिशा फिल्मस या कंपनीकडून कमिशनपोटी पाच लाख 40 हजार रुपये घेतले. आरोपींनी एकूण 12 लाख 45 हजार 800 रुपये घेतले. चित्रपट ओटीटीवर रिलीज केला. मात्र त्याचे पैसे फिर्यादी यांना न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.