चिखली, हिंजवडी, दिघीतून पाच लाखांचा ऐवज चोरीला

0
323

चिखली, दि. ११ (पीसीबी) – चिखली, हिंजवडी आणि दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १०) चोरीच्या तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यात चार लाख 92 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.

चिखली पोलीस ठाण्यात 44 वर्षीय महिलेने अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 60 वर्षीय आई घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेऊन दुकानात बसल्या असताना चोरट्याने घरातून सोन्याचे गंठण, राणीहार, अंगठ्या आणि रोख रक्कम असा एक लाख 85 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी सव्वासहा ते साडेसहा या 15 मिनिटात घडला.

हिंजवडी पोलीस ठाण्यात शुभम श्रीरंग साखरे (वय 26, रा. हिंजवडी गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. साखरे यांचा दीड लाखाचा टेम्पो त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 10) पहाटे घडली.

केतन राजेंद्र भोंडवे (वय 32, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भोंडवे आणि त्यांच्या आई सोमवारी दुपारी दोन वाजता बँकेच्या कामासाठी घराला कुलूप लावून गेले असताना अवघ्या 40 मिनिटात चोरट्याने घरफोडी करून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 57 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.