चिखली येथे पावणे दोन लाखांची घरफोडी

0
93

दि. १६ जुलै (पीसीबी) चिखली,
बंद घराचे कुलूप तोडून घरातून दागिने व रोख रक्कम असे एकूण पावणे दोन लाखांचा ऐवज चोरून देण्यात आला आहे. हा सारा प्रकार रविवार (दि.14) व सोमवार (दि.15) या कालावधीत चिखली येथील पाटील नगर परिसरात घडला आहे.

याप्रकरणी अमोल संजय तुपे (वय 30 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,फिर्यादी यांचे घर बंद असताना आरोपीने घराचे कुलूप हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटा मधील रोख एक लाख रुपये व 85 हजार रुपयांचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.