चिखली येथे दोन दुकानांचे शटर उचकटून रोकड चोरीला

0
119

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) चिखली
चिखली येथील साने चौक ते शिवरकर चौक येथील दोन दुकानाचे शटर उचकटून चोरांनी रोख रक्क्म चोरून नेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री दहा ते शनिवारी (दि. 10) पहाटे चार वाजताच्या कालावधीत नेवाळेवस्ती, चिखली येथे घडली.

याप्रकरणी गणेश सदाशिव चालखोर (वय 37 रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सिटी प्लस मेडिको शॉप, व थोड्या अंतरावर शिवशक्ती मार्ट या दोन दुकानाचे शटर उचकटून चोरांनी फिर्यादी यांच्या दुकानातून 25 हजार रुपये व शिवशक्ती मार्ट येथून 12 हजार रुपये असे एकूण 37 हजार रुपये चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.