दि.०६ (पीसीबी)-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेत निवडणूक आयोगाने स्वतःच्याच आदेशाला फाटा दिला आहे. रचना करताना उणे किंवा अधिक फक्त १० टक्के चालू शकते असे स्पष्ट आदेश असताना प्रभाग क्रमांक १ चिखली, मोरे वस्ती या प्रभागात तब्बल २० टक्के जादाचा केला आहे. प्रारुप जाहिर केले त्यावेळी सर्वात मोठा प्रभाग हा मासुळकर कॉलनी होता आता ती जागा चिखली,मोरे वस्ती प्रभागाने घेतली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे या प्रभागाची रचना करतानाच आयोगाने स्वतःच्याच आदेशाला फाट्यावर मारले आहे. रचना करताना महायुतीसाठी सोयिची अशी रचना करून घेण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसते.
चिखली, मोरे वस्ती प्रभाग हा सर्व नियम डावलून केलेला प्रभाग आहे. २०१७ मध्ये या प्रभागातून सर्व पॅनलमध्ये भाजपचा पराभव करून अजित पवार यांच्या समर्थकांचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रोखण्यासाठी या रचनेत काही ठिकाणी फेरबदल केल्याचेही नजरेस पडते.