चिखली मध्ये लाकडाच्या गोडाऊनला आग

0
34

दि.1 (पीसीबी) – देहू आळंदी रस्त्यावर डायमंड चौक, चिखली येथे एका लाकडाच्या गोडाऊनला आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 1) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

डायमंड चौकातील चौधरी एंटरप्राइजेस या लाकडाची वखार आणि भंगार गोदामाला मध्यरात्री दीड वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार चिखली, मोशी, तळवडे, पिंपरी, प्राधिकरण, भोसरी, टाटा मोटर्स, आळंदी नगरपरिषद येथील एकूण बारा फायर टेंडर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाचे उप अधिकारी गौतम इंगवले आणि 35 जवानांनी आगीवर पाणी मारून आग आटोक्यात आणली.

आगीमध्ये गोडाऊन मधील प्लास्टिक, रबर, भंगार मटेरियल आणि लाकूड जळाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.