चिखली मधून 60 हजारांचा गुटखा जप्त

0
177

चिखली,दि.18 जुलै (पीसीबी) – चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरेवस्ती येथून पोलिसांनी 60 हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 17) करण्यात आली.सागर भरत शिंदे (वय 30, रा. मोरेवस्ती, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार चेतन सवत यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुटखा, पान मसाला याची विक्री, साठवणूक करण्यास बंदी असताना आरोपी सागर शिंदे याने त्याच्या खोलीत गुटखा साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 60 हजारांचा आरएमडी पान मसाला, सेंटेड तंबाखू गोल्डचा साठा जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.