चिखली मधून कार तर वाकड मधून टेम्पो चोरीला

0
199

चिखली, दि. १० (पीसीबी) – चिखली मधून पाच लाखाची कार चोरीला गेली. तर वाकड मधून पाच लाखाचा टेम्पो चोरीला गेला. याप्रकरणी शनिवारी (दि. 9) चिखली आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

श्याम चिंधुजी बोरडे (वय 45, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 4 ते 9 जुलै या कालावधीत फिर्यादी यांनी त्यांची पाच लाख रुपये किमतीची कार (एम एच 14 / एच के 2448) सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची कार चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

संजय शामराव ढेंबरे (वय 41, रा. गुजरनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांचा पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो (एम एच 14 / एम व्ही 4743) लक्ष्मणनगर मधील अक्षय पार्क येथे शुक्रवारी रात्री पार्क केला. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचा टेम्पो चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.