स्वामी समर्थ सेवामार्ग प्रमुख अण्णासाहेब मोरे, कृषिरत्न आबासाहेब मोरे यांचा उपक्रम
चिखली, दि. १५ (पीसीबी) – दिंडोरी प्रणित श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र राजे शिवाजी नगर चिखली प्राधिकरण पेठ क्र.१६ येथे बीजयुक्त गोमय गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग प्रमुख अण्णासाहेब मोरे, कृषिरत्न आबासाहेब अण्णासाहेब मोरे, कृषिरत्न आबासाहेब मोरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गोमय बीजयुक्त पर्यावरण पूरक गणेशमूर्तीचा उपक्रम मागील तीन वर्षांपासून राज्यभर सुरू केला आहे.
गाईचे शेण, शाडूची माती,पंचगव्ययुक्त,बिल्व बीजयुक्त आणि पूरक हळद कुंकू नैसर्गिक रंगाचा वापर करून पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.दिंडोरी येथील स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी गेली तीन वर्षे पर्यावरण संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे,असे केंद्र संचालक महेश पोळ यांनी सांगितले.
गोमय गणेशमूर्ती घरामध्ये विसर्जन करून ती माती व त्यातील बीजे पुन्हा निसर्गात अंकुरित होतात. प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापरामुळे मागील दोन दशकात निसर्ग, समुद्र, विहिरी, नद्या यांची खूप हानी झाली आहे.
निसर्गाने दिलेले नद्या नाले,ओढे व एकूण जलसंपदा शुद्ध व स्वछ ठेवण्यासाठी गोमय गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भक्तानी घरोघरी करावी असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अध्यक्ष महेश पोळ,देविदास भोंग, बंडू जमदाडे, विश्वनाथ मोहन पवार, संजय कोंडीबा मामडगे,रामेश्वर निकम,कुलदीप राठोड,संजय हजारे,सोनाली बिर्ले,मेघा पोळ, संजीवनी शिंदे, रेश्मा भोंग, व स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या चिखली प्राधिकरण येथील सेवेकऱ्यांनी केले आहे.