दि.३ ( पीसीबी ) -पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, तथा प्रशासक यांनी सामान्य जनतेला नागरी सोसुविधा पासून वंचित ठेवू नये. त्याचप्रमाणे स्पाईन रोड प्राधिकरण चिखली घरकुल विकास कामाचा आराखडा जाहीर करण्याची मागणी घरकुल फेडरेशन ने केली आहे. पिंपरी चिंचवड शहराची नवीन ओळख आता रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना असं म्हणायची वेळ येते की पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेली खड्ड्यातआयुक्त साहेब पिंपरी चिंचवड शहरामध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा वेळेत भेटत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. प्रभागांमध्ये क्षत्रिय कार्यालय यांच्याकडून नागरिकांच्या तक्रारीचे निवारण होताना दिसत नाही. मनमानी कारभार चाललेला आहे. अधिकारी डेप्युटी इंजिनियर यांच्याकडून उडवा उडवी चे उत्तर नागरिकांना मिळत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आता खड्ड्यांनी घेतलेली आहे. त्या खड्ड्यांमुळे अनेक सामान्य नागरिकांचे त्याचप्रमाणे लहान बालकांचे सुद्धा प्राण गेलेले आहेत. याला जबाबदार कोण? या सर्व गोष्टी पाहता एक नाही अशा अनेक समस्या पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आहेत. आपण त्याच्याकडे गंभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी.शहराचा विकास करत असताना जो निधी आपण मंजूर केला. त्या निधीतून शहरातील विकास काम व्हायला पाहिजे होती. रस्त्यावरती पडलेल्या खड्डे हे त्वरित बुजवले गेले पाहिजे होते. असं न होता तो सर्वसामान्य जनतेच्या कष्टाचा घामाचा पैसा संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांना हाताशी धरून आपण सर्वांच्या सहमतीने आमचा कष्टाचा घामाचा पैसा तुम्ही खड्ड्यामध्ये घालवलेला आहे.
आणि तो पैसा आम्ही भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य. पिंपरी चिंचवड शहर कमिटी. च्या वतीने खड्ड्यातून पैसे काढून तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत. याची आपण दखल घ्यावी.त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील स्पाईन रोड चिखली घरकुल या ठिकाणी 160 इमारती असून तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या आहे. 2014 ते 2025 ह्या दरम्यान कोणते ही विकासाची काम घरकुल मध्ये झालेली नाहीत. आयुक्त साहेब याची आपण गंभीर्याने दखल घ्यावी.
घरकुल चा प्रकल्प झाल्यापासून आज पर्यंत आमच्या घरकुल मध्ये कुठेही विकास काम झालेली आढळत नाहीत. जर आपण पिंपरी चिंचवड शहराचा आयुक्त म्हणून पदभार सांभाळला तेव्हापासून आजपर्यंत विकास कामाचा आराखडा आपण घरकुलकरांच्या समोर मांडावा किती निधी घरकुलच्या विकास कामाला आला. किती निधी वापरला त्या निधीतून काय काम झाली. याचा लेखाजोखा आपण प्रसिद्ध करावा ही आपणास विनंती करत आहोत.
ही सर्व यंत्रणा आचार संहिता लागायच्या आत मध्ये आपण घरकुलकरांच्या विकास कामाबद्दल निधीबद्दल जो काही लेखाजोखा आराखडा असेल तो त्वरित मांडवा ही सर्व घरकुलकरांकडून आपणास मागणी करत आहोत.