चिखलीमध्ये वाहनांची तोडफोड; एका तरुणास लुटले

0
63

चिखली,दि. 06 (पीसीबी) : वाहनांच्या काचा फोडून एका तरुणास लुटण्यात आले. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मोरे वस्ती, चिखली येथे घडली.

धनराज चंद्रकांत शिंदे (वय 34, रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी मंगळवारी (दि. ५) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी साहिल नरळकर (रा. भोसरी) काळ्या उर्फ अजय गुप्ता (रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी धनराज शिंदे हे चिंचेचा मळा, म्‍हेत्रे वस्ती, चिखली येथून चालले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना जबरदस्तीने पकडले. फिर्यादी धनराज शिंदे यांच्या खिशातील 700 रुपये रोख काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांचा टेम्पो, टॅंकर गाड्यांच्या काचा दगड व सिमेंट ब्लॉक फेकून मारून फोडल्‍या. तसेच फिर्यादीच्या शेजारी पार्क केलेल्या इतर वाहनांची देखील तोडफोड केली. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.