चिखलीमध्ये एकाच रात्री पाच दुकाने फोडली

0
154

चिखली, दि. 13 (प्रतिनिधी)

कृष्णा नगर चिखली परिसरात एकाच रात्री चोरट्यांनी पाच दुकाने फोडली. दुकानातून 12 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 13) पहाटे चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

अर्जुनकुमार अंदारामजी गाची (वय 26, रा. शरदनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाची यांचे कृष्णानगर चिखली येथे मयुरी फॅशन नावाचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. त्या दुकानात मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. त्यासह गाची यांच्या दुकानाच्या बाजूला असलेले अरबाज युसूफ मुल्ला यांचे बोबडे पॅथॉलॉजी नावाचे दुकान, प्रवीणकुमार वचनाजी गाची यांचे चामुंडा गारमेंट, मगाराम कर्ताराम देवासी यांचे महादेव प्युअर व्हेज हॉटेल, युवराज शिवाजी करळे यांचे राज दूध डेअरी या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 10 हजार 700 रुपये रोख रक्कम आणि दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण 12 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.