चिखलीत सोनसाखळी चोरास अटक

0
111

चिखली, १७ जुलै (पीसीबी) – महिलांच्‍या गळ्यातील सोनसाखळी चोरणार्‍यास पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 16) दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास घडली.मोनुकुमार लल्‍लन बिंद (वय 26, रा. पवार वस्‍ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पल्‍लवी कृष्‍णा खंडागळे (वय 27, रा. भक्‍ती हौसिंग सोासयटी, घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक विठ्‌ठल साळुंखे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी पल्‍लवी या मंगळवारी दुपारी सव्‍वाबारा वाजताच्‍या सुमारास नेवाळे वस्‍ती, चिखली येथून रस्‍त्‍याने पायी घरी येत होत्‍या. त्‍या घरकुल येथे आल्‍या असता त्‍यांच्‍या समोरच्‍या दिशेने आलेल्‍या चोरट्याने पल्‍लवी यांच्‍या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्‍याचे मनी मंगळसूत्र हिसकावले.

मंगळवारी सोनसाखळी चोरल्‍यानंतर काही अंतर गेल्‍यावर आरोपी दुचाकीवरून पडला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता त्यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसला. त्‍यानंतर पोलिसांनी त्‍याच्‍या इन्‍टाग्राम आयडीवरून फोन नंबर मिळविला. त्‍या फोन नंबरच्‍या आधारे त्‍याला दरोडा विरोधी पथकाने अटक केली. आरोपी मोनुकुमार याने रविवारी देखील चिखली परिसरात सोनसाखळी चोरी केली होती. चिखली पोलीस तपास करीत आहेत.