चिखलीत पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला..

0
274

चिखली, दि. १० (पीसीबी) – चिखली मधील कृष्णानगर येथे पादचारी तरुणाचा मोबाईल फोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना एक जून रोजी मध्यरात्री दीड वाजता घडली.कुलोकेश गोपाळ माळी (वय 19, रा. घरकुल चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णानगर भाजी मंडई चौकातून मध्यरात्री दीड वाजता फिर्यादी माळी पायी चालत जात होते. तिथे दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी माळी यांच्या पॅन्टच्या खिशातून आठ हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.