चिखलीत गुटख्याचा टेम्पो पकडला १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
275

चिखली, दि. १७ (पीसीबी) – चिखली परिसरात दरोडा विरोधी पथकाने एक टेम्पो संशयावरून पकडला. त्यामध्ये पोलिसांना तब्बल नऊ लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी गुटखा, टेम्पो, दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण १७ लाख १२ हजार २८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. १५) रात्री करण्यात आली.

शाकिर शब्बीर अन्सारी (वय २३, रा. गंजपेठ, पुणे), चाँद गुलाम शेख (वय ४२, रा. भवानी पेठ, पुणे), नफिज शरिफ अहमद अन्सारी (वय ३४, रा. कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस चिखली परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक दुचाकी आणि टेम्पो संशयितपणे जात असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून दुचाकी आणि टेम्पो अडवून तपासणी केली असता टेम्पोमध्ये गुटख्याची २८ पोती आढळली. पोलिसांनी नऊ लाख ६८ हजारांचा गुटखा, चार लाख ४३ हजार रुपये रोख रक्कम, अडीच लाखांचा टेम्पो आणि ५० हजारांची दुचाकी जप्त केली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे, सहायक निरीक्षक नकुल न्यामणे, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस अमंलदार राहूल खारगे, प्रविण माने, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, प्रशांत सैद, औदुंबर रोंगे, किसन वडेकर, शिंदे व घनवड यांनी केली.