चिखलीतील महापालिका संचलित संतपीठात पर्यावरणदिन साजरा

0
797

चिखली, दि. ३ (पीसीबी) – प्लॅस्टिकमुक्त शहर करण्यासाठी नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे. आपले घर, परिसर प्लॅस्टिकमुक्त करून याची सुरूवात करावी असे, आवाहन महापालिकेचे उपायुक्त तथा संतपीठाचे संचालक संदीप खोत यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका संचलित टाळगाव चिखली येथील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. संतपिठाच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक हभप राजूमहाराज ढोरे, प्राचार्या मृदुला महाजन, स्कूलमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्राचार्या महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात राजूमहाराज ढोरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. स्वाती मुळे यांनी आभार मानले