चिकन दुकानातील कामगाराने केली चोरी

0
561

दापोडी,दि. १३ (पीसीबी) – कनच्या दुकानात काम करत असलेल्या एका कामगाराने दुकानातून रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक वजन काटा चोरून नेला. ही घटना एक ते पाच जुलै या कालावधीत दापोडी येथे घडली.

अन्वर हुसेन बुढन शेख (वय 43, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मन्सूरआली मीर (रा. मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मन्सूर आली हा फिर्यादी यांच्या चिकन दुकानात काम करत होता. चिकन दुकानात चिकन विक्रीतून मिळालेल्या चाळीस हजार रुपये आरोपीने फिर्यादी यांना न देता ते पैसे स्वतःकडे ठेवले. तसेच आरोपी राहत असलेल्या फिर्यादी यांच्या किराणा दुकानातून पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक वजन काटा आरोपीने चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.