चिंबळी येथील कंपनीत चोरी

0
75

महाळुंगे, दि. 30 जुलै (पीसीबी) – चिंबळी येथील ईका केमिकल प्रा ली या कंपनीतून दोन इलेक्ट्रिक मोटार आणि कंपनीच्या बाहेर पार्क केलेल्या डंपर मधून दोन बॅटऱ्या चोरून नेल्या. ही घटना 22 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.अमित शांताराम जाधव (वय 35, रा. चिंबळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंबळी येथील ईका केमिकल प्रा ली या कंपनीमधून अज्ञात चोरट्याने दोन इलेक्ट्रिक मोटार आणि कंपनीच्या बाहेर पार्क केलेल्या डंपरमधून दोन बॅटऱ्याअसा एकूण 84 हजारांचा ऐवज चोरून नेला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.