चिंबळी गावातील दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

0
483

आळंदी,दि. ७ (पीसीबी) – आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी गावात इंद्रायणी नदीच्या कडेला लावलेल्या एका हातभट्टी दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी दहा लाख 71 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 6) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली.

गणेश मन्नावर, दया चौधरी (दोघे रा. मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार महेश भालचिम यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चिंबळी गावात इंद्रायणी नदीच्या काठावर दारूभट्टी लावली. दारू तयार करण्यासाठी 20 हजार लिटर कच्चे रसायन, 710 लिटर तयार हातभट्टी दारू बाळगली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 10 लाख 71 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.