चिंचवड संवेदनशील घोषित करा – सचिन काळभोर यांची मागणी

0
337

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – कै लक्ष्मण जगताप ह्यांचे निधन झाल्यानंतर चिंचवड विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असून २७ फेब्रुवारी रोजी चिंचवड विधानसभा निवडणूक होणार असून मतमोजणी २ मार्च रोजी होणार असून चिंचवड विधानसभा मतदारसंघ अतिसंवेदनशील घोषित करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मुख्य निवडणुक आयुक्त पुणे यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटल आहे की, चिंचवड विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी गुन्हेगारी टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून घातपात होण्याची दाट शक्यता आहे गेल्या वर्षी कै लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप ह्यांच्या कार्यालय ह्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. पोटनिवडणुकीत नवीन उमेदवार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून साम, दाम, दंड भेद नितीची वापर होऊ शकतो. चिंचवड विधानसभा मतदारसंघ काळेवाडी, रहाटणी, वाकड, डांगे चौक, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, रावेत, पुनावळे, ताथवडे, पिपळे सौदागर, पिपळे निलख या ठिकाणी गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असून पोटनिवडणुकीत मतदारांना धमकी देऊन मतदारांवर दबावतंत्र वापर होवू शकतो. मतदारांना पैशाच आमिष दाखवून मतदान केले जावू शकते. झोपडपट्टी भागात मतदार यांना धमकी देऊन मतदान करण्यासाठी दबावतंत्र वापर करण्यात येवू शकते.

२०१९ रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघात दिवंगत लक्ष्मण जगताप यांना १ लाख ५० हजार ७२३ मतदान नागरिकांनी केले होते तर, राहुल कलाटे यांना १ लाख बारा हजार दोनशे पंचवीस मतदान नागरिकांनी केले होते. लक्ष्मण जगताप ह्यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालय पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. त्या अनुषंगाने त्यांना निवडणूक कालावधीमध्ये पोलिस संरक्षण देण्यात यावे तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघ अतिसंवेदनशील घोषित करण्यात यावा,असेही काळभोर यांनी पत्रात म्हटले आहे.