चिंचवड विधानसभा मतदारसंघात २१ उमेदवार, काटेंची माघार आणि भोईर रिंगणात कायम

0
107

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) –
चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी अपक्ष नाना काटे यांच्यासह फक्त सात उमेदवारांची माघार झाली. आता महायुतीचे शंकर जगताप, महाविकास आघाडीचे राहुल कलाटे आणि अपक्ष भाऊसाहेब भोईर अशी तिरंगी लढत अटळ आहे. मराठा आंदोलन समर्थक अरुण पवार, संदिप चिंचवडे, शिवाजी पाडुळे यांचा प्रमुख माघार उमेदवारांत समावेश आहे.

प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे, पक्ष

कलाटे राहुल तानाजी – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
जगताप शंकर पांडुरंग- भारतीय जनता पार्टी
राजेंद्र कुंडलिक गायकवाड- बहुजन समाज पार्टी
भापकर मारुती साहेबराव- महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
रफीक रशीद कुरेशी- स्वराज्य शक्ती सेना
सतिश भास्कर काळे- स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना
सिध्दिक इस्माईल शेख- ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
अतुल गणेश समर्थ- अपक्ष
ॲड. अनिल बाबू सोनवणे – अपक्ष
करण नानासाहेब गाडे- अपक्ष
जावेद रशीद शेख- अपक्ष
धर्मराज अनिल बनसोडे- अपक्ष
भाऊसाहेब सोपानराव भोईर- अपक्ष
मयुर बाबु घोडके- अपक्ष
रविंद्र विनायक पारधे- अपक्ष
राजेंद्र आत्माराम पवार- अपक्ष
राजेंद्र मारुती काटे- अपक्ष
रुपेश रमेश शिंदे- अपक्ष
विनायक सोपान ओव्हाळ- अपक्ष
सचिन अरुण सिद्धे- अपक्ष
सचिन वसंत सोनकांबळे- अपक्ष