जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने, चिंचवड येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे .त्यामध्ये मोरया गोसावी मंदिर, पवनाकाठ, धनेश्वर मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चापेकर वाडा, यांना भेट देण्यात येणार आहे. यावेळी इतिहासाचे अभ्यासक व गाव ते महानगर या पुस्तकाचे लेखक श्रीकांत चौगुले हे वारसा स्थळांची माहिती देणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन पद्मेश कुलकर्णी व राहुल ताम्हनकर यांनी केले असून, रविवार दि २३ रोजी स. ९ वाजता मोरया गोसावी मंदिरापासून हेरिटेज वॉकला सुरुवात होईल, असे त्यांनी कळविले आहे.












































