“चिंचवड येथे उद्योगांच्या समस्यांवरील बैठक आणि मा. उदय सामंत यांचा सत्कार”

0
9

दि.24 (पीसीबी) – आज चिंचवड येथे उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बैठकीत मा उदयजी सामंत यांची महाराष्ट्र राज्याच्या उद्योग मंत्रीपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.
पिंपरी, चिंचवड,भोसरी येथील cetp प्लांट, घातक कचरा प्रक्रिया प्रकल्प, एफ2 ब्लॉक येथील अग्निशमन केंद्र व चाकण येथील उद्योजकांना मुळ शेतकऱ्यांकडून प्लॉटवर बांधकाम करण्यात होणाऱ्या त्रासाबाबत चर्चा करण्यात आली. मा उद्योग मंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना cetp प्लांट,घातक कचरा प्रकल्प व अग्निशमन केंद्र यांचे काम तातडीने सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. चाकण येथे मुळ शेतकऱ्यांबाबत पोलीस बंदोबस्त देऊन बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले.