चिंचवड मध्ये महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमे निमित्त महाभोंडला व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

0
318

योगदान प्रतिष्ठान व नगरसेवक सुरेश भाोईर वतीने करण्यात आले होते

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – कोजागिरी पौर्णिमा निमित्त महाभोंडला व त्यानिमित्त सर्व महिला भगिनींनसाठी सन मराठी प्रस्तुत आनंद सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला गेला व महिलांसाठी खास आकर्षक भेट वस्तू व पैठणी साड्या विजेत्यांना देण्यात आल्या चिंचवड मधील महिलांनी दिवसभर या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटला

त्यामध्ये पहिला क्रमांक सौ. मोनिका डफळ यांना मानाची पैठणी देण्यात आली व दुसरा क्रमांक मृणाल मुळे व तिसरा क्रमांक सौ शुभांगीताई देशमुख यांना देण्यात आला.

ह्या कार्यक्रमासाठी आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे , महिला मोर्च्याच्या अध्यक्षा सुजाताताई पालांडे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे सिने अभिनेता आशिषजी पवार , नगरसेविका माधुरीताई कुलकर्णी, अश्विनीताई चिंचवडे, विमलताई काळे, वैशाली खाडे, निताताई कुशारे, ह. भ. प. संगीताताई चोपडे, ह . भ. प. उर्मिला ताई अघोर, दिपालीताई कलापुरे, पूजा ताई सराफ, पल्लवी ताई पाठक मनीषाताई चिंचवडे व इतर माहिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व महिलांना स्नेहभोजन व विशेष गिफ्ट वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर व योगदान फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते