चिंचवड मध्ये भाजपचा गुलाल !!! अश्विनी जगताप विजयी

0
334

चिंचवड, दि. ०२ (पीसीबी) – चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होती. भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्याच तिरंगी लढाई होती.मात्र मत मोजणीला सुरुवात होताच अश्विनी जगताप कायमच आघाडीवर असल्याचं दिसून येत होत त्यामुळे चिंचवड भाजपचाच हे तेव्हाच निश्चित झालं होत . आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचं या मतदार संघात मोठं प्रभुत्व होत आणि त्याचाच मोठा फायदा हा अश्विनी जगतापांना झाल्याचं बोललं जातंय