चिंचवड मधून भव्य पदयात्रा : भाऊसाहेबांसोबत हजारो लोकं रस्त्यावर उतरून पदयात्रेत सहभागी

0
81

भाऊसाहेब भोईर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न

चिंचवड, दि. १४ : चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जनतेतून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक नगरी म्हणून नव्याने ओळख निर्माण करून देण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे भाऊसाहेब भोईर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना कपाट हे चिन्ह मिळाले असून हे चित्र मतदार संघात घरा घरात पोहचवण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. काल भाऊसाहेब भोईर यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन चिंचवड येथे झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.

गेली आठ दहा दिवसांपासून मतदारसंघात पदयात्रा, प्रत्यक्ष मतदारांच्या गाठी भेटी, संवाद बैठका घेवून चिंचवड मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. या प्रचार दौऱ्या दरम्यान मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. काल दिनांक १३ नोव्हेंबर रोजी चिंचवड येथे निवडणूक कचेरीचे भव्य उद्घटन करण्यात आले. तत्पूर्वी चिंचवड मधून भव्य रॅली काढण्यात आली यामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. चिंचवडगाव आणि परिसर भाऊसाहेब भोईर यांचा बालेकिल्ला असून या भागांतून भरपूर लीड मिळेल असा अंदाज आहे.

मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन , पदयात्रा आणि संवाद बैठकीझाली. दरम्यान भव्य पदयात्रा काढण्यात आली. याची सुरूवात मोरया गोसावी क्रीडांगण येथून सुरुवात होऊन विठ्ठल रुक्माई मंदिर येथे सांगता झाली. पदयात्रा मार्ग मोरया गोसावी क्रीडांगण – मोरया गोसावी राज पार्क फेज 1 – राज पार्क शनी मंदिर कचेरीचे उद्घाटन – काकडे पार्क – पोद्दार शाळा – राजू गावडे यांचा बंगला – गजानन महाराज मंदिर – भीम नगर – बुद्ध विहार – केशवनगर शाळा – साईबाबा मंदिर – विठ्ठल रखुमाई मंदिर – शनी मंदिर – काळभैरवनाथ मंदिर – मंगलमूर्ती वाडा – धनेश्वर मंदिर – मोरया गोसावी मंदिर – सुखकर्ता – राम मंदिर हनुमान मंदिर – गांधी पेठ कचेरी उद्घाटन – भाजी मंडई – अमित कॉम्प्लेक्स – गोखले वृंदावन – शांतीबन – जुना जाकात नाका – सिल्वर गार्डन – चाफेकर चौक – भुई आळी – विठ्ठल रुक्माई मंदिर या मार्गात लोकांनी उत्साह दाखवला.

“आपण विविध टॅक्स भरतो पण पुढे भ्रष्टाचार झालेला दिसतो. तेव्हा लोकांनी भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहावे. महानगर पालिकेच्या गेल्या दोन वर्षात दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. लोकांच्या पैशाची उधळपट्टी थांबवली पाहिजे. सत्तेतील लोकांना वाटतं की आपण धन शक्तीच्या जोरावर कुणालाही विकत घेवू शकतो, पण आता लोकांनी ही निवडणूक हातात घेवून जनशक्ती दाखवली पाहिजे. उमेदवाराची पार्श्वभूमी पाहून आपले अमूल्य मत व्यक्त केले पाहिजे. चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० तारखेला कपाट या चिन्हा समोरील बटण दाबून बदल घडवा मी तुमच्या सोबत आहे” असे भाऊसाहेब भोईर म्हणाले