चिंचवड मतदारसंघात ‘या’ दहा कारणांसाठी हवे आहे महाविकास आघाडीच्या नाना काटेंचे नेतृत्व !

0
253

चिंचवड, दि. 20 ( प्रतिनिधी) – अनेक गावांच्या समूहातून तयार झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात मिश्र संस्कृती दिसून येते. एकीकडे जुन्या प्रथा जपणारी अस्सल गावठाणातील लोकं तर दुसरीकडे वस्त्रात, वावरात आधुनिकता ल्यालेली उच्चशिक्षित आयटीयन्स. याशिवाय उद्योजक, नोकरदार, व्यावसायिक असा मोठा वर्ग या परिसरात दिसतो. पिंपरी विधानसभेच्या तुलनेत झोपडपट्टीचा नगण्य परिसर तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा असल्याने हा सुशिक्षित मतदारसंघ म्हणूनदेखील ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोक नोकरीसाठी येथे स्थलांतरित झाले आहेत. म्हणूनच पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार अशी ही या मतदारसंघाची ओळख आहे.

2009 ते 2023 पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत ‘लक्ष्मण जगताप’ यांनी चिंचवड मतदारसंघ अक्षरशः एकहाती लढवला, जिंकला आणि मजबुतीने ताब्यातही ठेवला. हा त्यांचा अभेद्य किल्ला जिंकणं तसं प्रतिस्पर्धी उमेदवारासाठी सोपं नाहीच. मात्र, त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हा मतदारसंघ योग्य हातात जावा, अशी इथल्या मतदारांची अपेक्षा आहे. या मतदारसंघाचा वाली हा इथल्या मातीतला तर असावाच, पण इथल्या प्रत्येक प्रश्नांची जाण असणारा, त्या प्रश्नांसाठी मनापासून लढणारा, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा असावा, ही मतदारांची रास्त अपेक्षा आहे. या अपेक्षांना खरे उतरणारे सध्या तरी एकच नाव आहे, ते म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे !

चिंचवड मतदारसंघासाठी ‘या’ दहा कारणांसाठी हवे नाना काटेंचेच नेतृत्व !
1. चिंचवड हा पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या अथक आणि अविरत प्रयत्नांमुळे आज औद्योगिक विकासाची फळे चाखत आहे.

2. या शहरातील भरभराट आणि संपूर्ण शहरात पायाभूत सुविधांपासून नागरिकांच्या राहणीमानाचा झालेला कायापालट हे निर्विवादपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे योगदान आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या विकासाभिमुख राजकारणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आजवर दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रयत्नपूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न नाना काटे यांनी केला आहे.

3. नाना काटे यांच्या याच प्रयत्नांचा परिपाक म्हणजे रहाटणी- पिंपळे सौदागर हा परिसर आज शहरातील सर्वाधिक विकसित, स्वच्छ आणि सुंदर परिसर म्हणून नावारूपाला आला आहे. योग्य नियोजन आणि वेगवान व्यवस्थापन यांच्या माध्यमातून आजवर त्यांनी त्यांच्या प्रभागातील विकासाला नवी उंची प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपळे सौदागरचा झालेला सर्वांगीण विकास हा नाना काटे यांच्या आजवरच्या सातत्यपुर्वक केलेल्या विकासकामांचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

4. ‘लोकसहभागातून लोकपरीवर्तन’ या सूत्राप्रमाणे काम करत असताना सर्वांच्या अडचणी सोडविण्यासाठी नाना काटेंनी नेहमीच कटिबध्द राहण्याचा प्रयत्न केला आहे. या विकास कामांत नागरिकांचा नेहमीच त्यांना सक्रिय पाठिंबा राहिला आहे. लोकसहभागाशिवाय इतका प्रचंड विकास करणे शक्य नव्हते.

5. पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावत असताना सातत्याने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नानांनी केले आहे. महापालिका सत्ताकाळात आणि सत्ता नसताना देखील त्यांना निवडून देणाऱ्या लोकांचे कुठलेही काम अडून राहणार नाही याची पुरेपूर काळजी नानांनी वेळोवेळी घेतली आहे.

6. शासनाच्या योजना, महापालिकेचे सर्व लाभ हे सर्वसामान्य नागरिकांना मिळायला हवेत हाच नाना काटे यांचा कायम प्रयत्न राहिला आहे.

7. गेली 20 वर्षे सक्रियपणे पक्ष संघटनेत करत असलेल्या आणि आजवर केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवत असल्यामुळे येथील सजग आणि सुज्ञ मतदार आपल्याला नक्कीच बहुमताने विजयी करतील, अशी नाना काटे यांना पूर्ण खात्री आहे.

8. चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा प्रत्येक क्षेत्रात विकासाला केंद्रस्थानी ठेवून नाना काटे यांनी योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.

9. युवक, बालक, महिला, ज्येष्ठ अशा सर्वांना सन्मानाचे जीवन लाभावे यासाठी नाना सदैव कटिबध्द राहिले. काम करत असताना कुठलाही भेदभाव न बाळगता सर्व जातीय, धार्मिक, भाषिक, प्रांतीय लोकांना समानतेने वागविल्याने सर्वांच्या साथीने विकासाचा नवा अध्याय लिहिण्यात त्यांना यश आले आहे.

10. कुठल्याही गैरप्रकाराला पाठीशी न घालता लोकाभिमुख व पारदर्शक कारभार हेच नाना काटे यांच्या आजवरच्या कामाचे ब्रीद राहिले आहे