चिंचवड ता. २६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे देशभरातून पर्यटक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गेले होते. मासूम, निष्पाप, बेगुना पर्यटकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला त्यात सत्तावीस पर्यटक मृत पावले. त्यांच्या चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून, मृतांच्या शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत हा संदेश सामुहीकरित्या एकत्रित येवून मेणबत्ती पेटवून त्यांना श्रद्धांजली आज संध्याकाळी चिंचवड रेल्वे स्थानकावर वाहन्यात आली. प्रवासीयांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला . यावेळी चिंचवड रेल्वे स्थानकाच्या प्रमुख शोभा वर्मा, प्रवासी , सीजीएस विभागाचे सतीश गायकवाड, प्रमोद काळे, आरपीएफ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मूळचंद चौरासिया, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार ,पदाधिकारी मनोहर जेठवाणी, नंदू भोगले ,मुकेश चुडासमा , सतीश शीलम, सुशील पाकवानी ,नंदू नारंग ,आतप्रकाश मतांनी . अजित तंजवाणी, पितांबर येहलानी समवेत आदी उपस्थित होते.