चिंचवड, कसबा पोटनिवडणूक २७ फेब्रुवारी,तर निकाल २ मार्च

0
366

चिंचवड , दि. १८ (पीसीबी) – राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात 27 तारखेला ही पोटनिवडणूक होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं नुकतंच निधन झालं.कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचंही काही दिवसांपूर्वीच निधन झालं या दोन्ही आमदारांच्या जागी आता पोट निवडणूक घेतली जाणार आहे.

निवडणूक कार्यक्रम कसा?
– निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, ३१ जानेवारी २०२३ रोजी उमेदावारांची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल.
– ०७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल.
– ०८ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्जांची छाननी होईल.
– १० फेब्रुवारी २०२३ रोजी शुक्रवारी अर्ज परत घेण्याची तारीख असेल.
– २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या जागांसाठीचं मतदान पार पडेल.
– ०२ मार्च रोजी मतमोजणी होईल.

ज्या वेळी एखाद्या आमदाराचं आकस्मिक निधन होतं, त्यावेळी सदर पक्षाद्वारे ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी अथवा विनंती केली जाते. या राजकीय परंपरेनुसार, भाजपतर्फेही अशी मागणी करण्यात येईल, असं म्हटलं जातंय. मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही जगांसाठी दावेदारी सुरु झाली आहे. त्यामुळे दोन्ही जागांवरील निवडणूक बिनविरोध होईल की चुरशीची निवडणूक होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.