चिंचवडला प्रकटदिनादिवशी मिरवणूक खोटे बोलणे आणि निंदा करणे सोडा चैतन्यमहाराज वाडेकर : चिंचवडला प्रकटदिनादिवशी मिरवणूक

0
363

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : आपण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलतो, पंरतु ते टाळायला हवे. तसेच इतरांची निंदा करतो, इतरांची निंदा करणं चुकीचं आहे, असे मत प्रसिद्ध किर्तनकार चैतन्यमहाराज वाडेकर यांनी व्यक्त केले. चिंचवड वाल्हेकरवाडीतील रजनीगंधा हौसिंग सोसायटीमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिर उभारले आहे.श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळयाच्या निमित्ताने गेल्या रविवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. भजन, कीर्तन, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम झाले.

स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट, रजनीगंधा सांस्कृतिक मंडळ तसेच स्वर्गीय आनंदा चिंचवडे आनंद भाऊ चिंचवडे सोशल युथ फाऊंडेशन यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन केले. दररोज सकाळी आठ ते अकरा या वेळेत पोथीवाचन तसेच दुपारी दोन ते चार या वेळात भजन सेवा झाली. त्यात भजनांचे कार्यक्रम झाले. रजनीगंधा महिला मंडळाचे अध्यक्ष सुजाता चिंचवडे यांच्या माध्यमातून विविध मंडळांची भजनसेवा झाली. तसेच सायंकाळी सात ते नऊ या वेळेत भक्ती संगीत कार्यक्रम तसेच दररोज पाच ते दहा या वेळेमध्ये होम हवन असे विविध कार्यक्रम झाले.

बुधवारी रात्री चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन झाले. त्यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन केले. तुकोबारायांच्या जीवनातील विविध घटना त्यांच्या अभंगातील सामाजिक आणि अध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगितले.

वाडेकर म्हणाले, ‘‘मनुष्य जीवनाच्या उद्धारासाठी संत साहित्य संतांचे विचार उद्धारक आहेत. संतांनी आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून आपणास जगण्याची दृष्टी दिली आहे. मनुष्य जीवनाच्या उद्धारासाठी संत साहित्य संतांचे विचार उद्धारक आहेत. वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून जगण्याचे जीवनदर्शन घडविले आहे.’’
………
आणि रंगल्या फुगड्या, खेळ
भजन, कीर्तन, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम झाले. लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले. प्रकट दिनाच्या दिवशी भजन, महाप्रसाद आणि मिरवणूक काढण्यात आली. त्यात वारकरी पथक सहभागी झाले होते. तसेच महिलांची फुगड्या रंगल्या. तसेच पारंपरिक खेळही रंगले. पारंपरिक वेश परिधान करून महिला सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
……………………
यावेळी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते वाडेकर यांचा सत्कार केला. यावेळी माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, गोरोबा कोल्हे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, संयोजक अंकुश उर्फ नाना चिंचवडे, सागर चिंचवडे, यश चिंचवडे, दिलीप कोकरे, संजय रवंदळ, प्रकाश चव्हाण, वैजनाथ माळी, हणुमंत माळी, विकास पाटील, बी एन माने, शंकरराव सावंत, दीपक पाटील, दशरथ सोनवणे, रघुनाथ पाटील, सुशील पिंगळे, रवींद्र कुरवडे, संदीप महाले, रितेश सरोदे, सदाशिव जाधव, सूर्यकांत दिवेकर, किरण ढवळे, रणजीत भापकर, संजय कुलकर्णी, सुनील काळे, अनिल धामणे यांनी आदी उपस्थित होते.