चिंचवडला निराधारांना ब्लॅंकेट वाटप

0
48

पिंपरी, दि. 03 (पीसीबी) : थेरगाव येथील बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत सुमारे २० निराधार, गरीब लोकांना सोमवारी (ता. २) थंडीनिमित्त उबदार ब्लॅंकेटचे मोफत वाटप करण्यात आले. भर थंडीत उबदार ब्लॅंकेट मिळाल्याने निराधारांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

चिंचवड येथील धनेश्वर मंदिराजवळ हा कार्यक्रम झाला. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर शिवानंद हुल्याळकर यांच्या हस्ते हा ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे हिंदी भाषिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद राणा, व्यावसायिक डॉक्टर शेखर हुल्याळकर, चिंचवड येथील सोमेश्वर महाराज, पिंपरी- चिंचवड जंगम समाजाचे सल्लागार बसय्या हत्तूरमठ आदी यावेळी उपस्थित होते. बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मानतेश जालिहाळ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.