चिंचवडमध्ये 87 हजारांची घरफोडी

0
182

चिंचवड, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) – दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 87 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सुदर्शननगर, चिंचवड येथे रविवारी (दि. 4) पहाटे उघडकीस आली.दिगंबर लक्ष्मण बेडेकर (वय 74, रा. रेणुका साई को. ऑ. हौसिंग सोसयटी, सुदर्शनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बेडेकर यांचे घर 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट 2024 या कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून लॅच लॉक तोडून आतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 87 हजारांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.