चिंचवडमध्ये 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान

0
187

चिंचवड ,दि २६ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख 68 हजार 964 मतदार आहेत. त्यात तीन लाख दोन हजार 946 पुरुष तर दोन लाख 65 हजार 974 महिला आणि तृतीयपंथी 34 मतदार आहेत. दिव्यांग 12 हजार 313, 80 वर्षांवरील मतदारांची संख्या 9 हजार 926 आहे.

पहिल्या दोन तासात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 3.52 टक्के मतदान झाले होते. आता 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाले आहे. 36 हजार 866 पुरुष तर 22 हजार 570 अशा 59 हजार 437 जणांनी 11 वाजेपर्यंत मतदान केले आहे. सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.