चिंचवडमध्ये 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदान

0
218

– चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दुपारी एक वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदान झाले आहे.

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख 68 हजार 964 मतदार आहेत. त्यात तीन लाख दोन हजार 946 पुरुष तर दोन  लाख 65 हजार 974 महिला आणि तृतीयपंथी 34 मतदार आहेत. दिव्यांग 12 हजार 313,  80 वर्षांवरील मतदारांची संख्या 9 हजार 926 आहे. 

पहिल्या दोन तासात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 3.52 टक्के मतदान झाले होते. आता 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाले आहे. तर, दुपारी एक वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदान झाले. सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 5 लाख 68 हजार 954 मतदारांपैकी 69 हजार 838 पुरुष तर 47 हजार 838 महिला अशा 1 लाख 17 हजार 680 लोकांनी मतदान केले. 20.68 टक्के मतदान झाले आहे.