गाठी-भेटी घेऊन घेत मतदारांशी साधला संवाद
दि २१ एप्रिल (पीसीबी ) चिंचवड, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज, शनिवारी चिंचवड परिसरात पदयात्रा काढून प्रचार केला. ठिकठिकाणी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, युवकांनी, तसेच महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत केले. संजोग वाघेरे पाटील यांंनी संवाद साधत आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले.चिंचवडगावातील दर्शन नगरी, चित्तराव, गणपती मंदिर, प्रभात कॉलनी, मोरया गोसावी, राज पार्क, गोयल गरिमा, सोनेगिरा टाऊनशिप, काकडे पार्क, विवेक वसाहत, साईबाबा मंदिर, निंबाळकर आळी, भोईर आळी, तालेरा हॉस्पिटल परिसर, शिवाजी उदय मंडळ, लोंढे नगर व भीम नगर परिसरातून कार्यकर्त्यांसह मोठ्या संखेने पदयात्रा काढून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. या वेळी माजी नगरसेवक अनंत को-हाळे, ज्योतीताई निंबाळकर, शिवसेना शहर संघटिका अनिताताई तुतारे, उपजिल्हा समितीच्या वैशालीताई मराठे, कविता कोंढे देशमुख, राहुल भोईर, सागर चिंचवडे, निखील भोईर, सागर वाघेरे, विशाल जाधव, कॉंग्रेसचे संदीप शिंदे, झेवियर अंथनी, शेखर लोणकर, सुधाकर कुंभार, समन्वयक उषा अल्हाट, श्रीमंत गिरी, देवराम गावडे, राजू बुचडे, विशाल काळे, सचिन चिंचवडे, रेखा मोरे, प्रवीण शिंदे, आम आदमी पक्षाचे संघटक सचिन पवार, भ्रमानंद जाधव, राहुल वाघमारे, मीनाताई जावळे, संग्रामिनी जावळे, प्रकाश हगवणे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, माजी नगरसेवक अनंत को-हाळे, संतोष माचुतरे आणि कांताताई मुंडे, निलेश डोके यांचे निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. पदयात्रेतून मतदारांना मशाल चिन्ह लक्षात ठेवा आणि या निवडणुकीत मावळ लोकसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिलेदार संजोग वाघेरे पाटील प्रचंड माताधीधक्याने विजयी करा, असे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदारांना केले.












































