चिंचवडमध्ये महिलेला मारहाण

0
86

पिंपरी, दि. 6 (पीसीबी) –

भंगाराच्या दुकानातील उत्पन्नावरून एका महिलेला तिच्या दिराच्या मुलांनी मारहाण केली. ही घटना वेताळनगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि. 3) मध्यरात्री घडली.

याबाबत 37 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. 5) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमीर शेख, समीर शेख (रा. दळवीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगाराच्या दुकानातील पैसे मिळण्याच्या कारणावरून मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास आरोपी अमीर व समीर हे फिर्यादी महिलेच्या घरात घुसले. त्यांनी शिवीगाळ करीत फिर्यादी महिलेला हाताने मारहाण केली. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.