चिंचवडमध्ये भर रस्त्यात पेटली धावती मोटार, गाडीमध्ये होतं…

0
250

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – चिंचवडमधील संभाजीनगर येथे धावत्या ओमीनी मोटारीने शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास पेट घेतला. मोटारीतील चालकाने उडी मारली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मोटारीतील लॅपटॉप, इतर साहित्य जळाले.

मोटार थरमॅक्स चौकाकडून केएसबी चौकाकडे जात होती. संभाजीनगर येथील नोव्हेल इंटरनॅशनल शाळेजवळ मोटारीने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने उडी मारली. मोटार पेटल्याने धुराचे लोट हवेत पसरले होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. बघ्यांनी गर्दी केली होती.

याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र, बंब घटनास्थळी येईपर्यंत मोटार जळाली. मोटारीने पेट घेताच चालकाने प्रसंगावधान दाखवत उडी मारली. त्यामुळे कुठलीही इजा झाली नाही. परंतु गाडीमध्ये असलेला लॅपटॉप व इतर सामान जळाल्याचे प्रत्यक्षदर्शी अमित गोरखे यांनी सांगितले.