चिंचवडमध्ये दोन, आळंदीत एक पिस्टल पकडले, तिघांना अटक

0
277

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक असे तीन गावठी पिस्टल आणि तीन काडतुसे पकडली आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

रोहित उर्फ येशू दत्ता धावारे (वय १९, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड), अजय शंकर राठोड (रा. पाषाण पुणे), विष्णू आनंदा नरवडे (वय २२, रा. आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

श्रीधरनगर येथे रेल्वे पटरीवर एक तरुण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून रोहित धावारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक काडतूस जप्त केले आहे. चिंचवडगावात चिंचवड पोलिसांनी सापळा लावून अजय राठोड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि काडतूस जप्त केले आहे. या दोन्ही प्रकरणात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आळंदी येथील एका हॉस्पिटल जवळ एक तरुण पिस्टल घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाल्याने आळंदी पोलिसांनी सापळा लावून विष्णू नरवडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.